नवाजुद्दीनने 'या' चित्रपटासाठी घेतले एक रुपयांचे मानधन
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. हिरोपंती-2 (heropanti 2) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटामधील त्याच्या कॅरेक्टरबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीननं अनेक चित्रपटांसाठी कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे.
पण एका चित्रपटासाठी मात्र नवाजुद्दीननं केवळ एक रूपया मानधन घेतलं.
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या मंटो या चित्रपटासाठी नवाजुद्दीननं एक रूपया मानधन घेतलं. हा चित्रपट लेखक सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित आहे.
नवाजुद्दीननं या चित्रपटामध्ये मंटो यांची भूमिका साकारली. जेव्हा नवाजुद्दीननं या चित्रपटाचं कथानक ऐकलं तेव्हा हा चित्रपटासाठी मानधन न घेण्याचा नवाजुद्दीननं निर्णय घेतला होता.
'मंटो' ही भूमिका नवाजुद्दीनला जवळची वाटली. त्यामुळे त्यानं केवळ एक रूपया मानधन घेऊन या चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.
'मंटो' या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री नंदिता दासने केले होते. या चित्रपटाचे प्रचंड कौतुक झाले होते.