IPL 2021: क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा सराव सुरु, पहा फोटो

आयपीएल 2020 चे उपविजेते दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर दुबईत प्रशिक्षण सुरू केलं आहे. भारतीय खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि टीमचे व्यवस्थापक 21 ऑगस्ट रोजी इथं आलं होतं. (फोटो दिल्ली कॅपिटल्स ट्विटर)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फ्रँचायझीने दुबई स्थित आयसीसी अकादमीमध्ये खेळाडूंच्या प्रशिक्षणाचे फोटो सोशल मीडियाद्वारे पोस्ट केले आहेत. त्यांनी श्रेयस अय्यरचा खेळपट्टीवर येताना आणि षटकार मारण्याचा व्हिडिओ देखील पोस्ट केला. (फोटो दिल्ली कॅपिटल्स ट्विटर)

खांद्याच्या दुखापतीमुळे अय्यर आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात खेळला नाही. तो संघाच्या आगमनापूर्वी दोन आठवडे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. (फोटो दिल्ली कॅपिटल्स ट्विटर)
अमित मिश्रा, ललित यादव, लुकमान मेरीवाला, रिपल पटेल, विष्णू विनोद, प्रवीण दुबे आणि सिद्धार्थ मणिमारन सारखे दिल्ली कॅपिटल्सचे इतर खेळाडू देखील सराव करताना दिसले. (फोटो दिल्ली कॅपिटल्स ट्विटर)
दिल्लीचा संघ आठ सामन्यांत सहा विजय आणि दोन पराभवांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. दिल्ली त्यांची मोहीम 22 सप्टेंबरपासून सनरायझर्स हैदराबादसोबत सुरू करणार आहे. (फोटो दिल्ली कॅपिटल्स ट्विटर)