Wedding Bells! श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड रोहनशी गुपचूप लग्न केलं? वधू रुपातील फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतेच ब्रायडल शूटमधील काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. श्रद्धाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. लाल रंगाच्या लेहेंगामध्ये श्रद्धा अतिशय सुंदर लूकमध्ये दिसत आहे. खालील स्लाइडमध्ये पहा तिची अतिशय खास छायाचित्रे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या चित्रात ती वधूसारखी सजलेली दिसत आहे. वधूच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.
श्रद्धा कपूरच्या लेहेंगामध्ये गोल्डन भरतकाम करण्यात आले आहे. श्रद्धाचा लूकही अतिशय नेत्रदीपक दिसत आहे.
फोटो शेअर करत श्रद्धाने फॅशन डिझायनर्स फाल्गुनी पीकॉक आणि शेन पीकॉक यांचे आभार मानले. तिने लिहलंय, 'तुमच्या दोघांसोबत काम करणे हा नेहमीच एक सुखद अनुभव होता. तुझ्या या सुंदर पोशाखात मला सजवल्याबद्दल धन्यवाद.
श्रद्धाने हेवी नेकलेस आणि फुल स्लीव्ह ब्लाउजसह सोनेरी मांगटीका घातली आहे.
श्रद्धा कपूरच्या या ताज्या पोस्टवर तिचा भाऊ सिद्धांत कपूरसह अनेक सेलेब्सनी कमेंट केल्या आहेत.