In Pics : 'या' खेळाडूंना नाही केलं रिटेन, आता होतोय संघाना पश्चाताप

यंदाच्या हंगामात 8 जागी 10 संघ खेळत असून नव्याने दोन संघ सामिल झाल्याने सर्वच संघामध्ये बरेच बदल झाले आहेत. बऱ्याच खेळाडूंना त्यांच्या संघाने रिटेन केले नाही तसेच लिलावातही विकत घेतले नाही. त्यामुळे त्यांना नव्या संघात जावे लागले, दरम्यान अशाच काही खेळाडूंनी नव्या संघात जात कमाल कामगिरी करत आपल्या जुन्या संघाला त्यांना गमावण्याचा पश्चाताप करायला लावला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हैदराबादला 2016 साली आयपीएलचा चषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या डेव्हिडचा 2021 साली खराब फॉर्म असल्यामुळे त्याला संघातून बाहेर ठेवण्यात आलं. ज्यानंतर 2022 ला रिटेन तर नाहीच उलट त्याला लिलिवातही हैदराबादने विकत घेतलं नाही. त्यानंतर दिल्लीने त्याला 6.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. ज्यानंतर वॉर्नरने दमदार कामगिरी केली असून आतापर्यंत 52.17 च्या शानदार सरासराने त्याने 313 रन केले आहेत. यावेळी त्याने तीन अर्धशतकंही ठोकली आहेत.

रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाचा मुख्य फिरकीपटू असणाऱ्या चहलला यंदा संघाने पुन्हा रिटेन केले नाही. त्यांना एक स्फोटक फलंदाजी करणारा फिरकीपटू हवा होता. या कारणामुळे चहलला गमावल्यानंतर बंगळुरुला आता मात्र याचा पश्चाताप होत आहे. कारण चहलने यंदा राजस्थान संघाकडून अगदी उत्तम कामगिरी सुरु ठेवली आहे. त्याने आतापर्यंत 11 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या शर्यतीतही अव्वल आहे.
2021 मध्ये चेन्नई संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदाज जोश हेजलवुडने दिलं. पण 2022 साली त्याला संघात न घेतल्याने चेन्नईला आता मात्र पश्चाताप करावा लागत आहेत, बंगळुरु संघाने हेजलवुडला सामिल केलं आहे. त्याने या हंगामात 7 सामन्यात 17.36 च्औया सरासरीने 11 विकेट्स घेतले आहेत. त्याच्या या कामगिरीला चेन्नई नक्कीच मिस करत असेल.
कोलकाता संघाने एक नाही तर सलग दोन वर्षे कुलदीप यादवला बेंचवर बसवून ठेवलं. या दरम्यान त्याची दुखापत कारणीभूत होतीच, पण तरी त्याला यंदा नक्कीच संधी देता आली असती. असं असतानाही केकेआरने यंदा कुलदीपला संघात पुन्हा घेतलं नाही, दिल्लीने त्याला आपल्या ताफ्यात सामिल केलं आणि कुलदीपने या संधीचा पुरेपुर फायदा देखील उचलला. कुलदीपने आतापर्यंत 10 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे
या यादीतीतल शेवटचं नाव म्हणजे स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या. मुंबईचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या हार्दिकने यंदा लिलावापूर्वीच नव्याने सामिल झालेल्या गुजरात संघाचा कर्णधार होत मुंबईची साथ सोडली. ज्यानंतस आता मात्र तो अतिशय दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत 10 सामन्यात 333 धावा ठोकल्या असून कर्णधार म्हणूनही त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने तीन अर्धशतकंही ठोकली आहेत.