GT vs DC, IPL 2023 : गुजरात विरुद्ध दिल्ली लढत; गुणतालिकेतील पहिल्या आणि शेवटच्या संघात रणसंग्राम

इंडियन प्रीमियर लीगच्या 44 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. आयपीएल 2023 च्या गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकाचा संघ आणि शेवटच्या दहाव्या क्रमांकाचा संघ यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे.

गुजरात टायटन्स 8 सामन्यांत 6 विजय आणि 2 पराभवांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरातने मागील सामन्यात कोलकाताचा पराभव केला.
दुसरीकडे, आयपीएल 2023 च्या सुरुवातीला पाच सामने गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या हंगामाची सुरुवात खराब झाली. संघ दोन विजयांसह लीगमध्ये पुन्हा परतला, पण दिल्लीला त्यांच्या मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला.
दिल्ली संघाने आतापर्यंत 8 सामन्यांपैकी फक्त 2 सामन्यांत विजय मिळवला असून संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ चार गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये गुजरात टायटन्स (GT) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं.
गुजरात संघाने दिल्लीविरोधातील दोन्ही सामने जिंकले आहेत तर दिल्ली संघाला एकही सामना जिंकण्यात यश मिळालेलं नाही.
गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आज, 02 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे.
image 11
हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.