Bird Flu : बर्ड फ्लूदरम्यान चिकन आणि अंडी खाणे कितपत सुरक्षित, तज्ज्ञांकडून जाणून घ्या कोणती खबरदारी घ्यावी.
गेल्या काही काळापासून जगभरात बर्ड फ्लूबाबत चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) ने टेक्सासमधील एका व्यक्तीला एव्हियन इन्फ्लूएंझा म्हणजेच बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी केली. मिळालेल्या माहितीनुसार, एच5एन1 विषाणूची लागण झालेल्या गायींच्या संपर्कात आल्यानंतर त्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली होती. माणसांमध्ये हा विषाणू आढळल्यानंतरही त्याबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बर्ड फ्लू ही नवी महामारी असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू संभाव्यत: साथीला कारणीभूत ठरू शकतो आणि कोव्हिडपेक्षा 100 पट वाईट असू शकतो. गायी आणि कोंबड्या या दोघांच्या संपर्कातून लोकांना विषाणूची लागण झाली आहे, हे लक्षात घेता, आता दूध पिणे किंवा चिकन आणि अंडी खाणे सुरक्षित आहे का? (Photo Credit : pexels )
बर्ड फ्लूच्या उद्रेकादरम्यान संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी अंडी आणि चिकन योग्य प्रकारे शिजले आहेत की नाही याची खात्री करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. चांगल्या प्रकारे तयार केलेल्या पोल्ट्री उत्पादनांमध्ये बर्ड फ्लू होण्याची शक्यता खूप कमी असली तरी संभाव्य संक्रमण रोखण्यासाठी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.(Photo Credit : pexels )
अंड्यांबद्दल बोलायचे झाले तर ते पूर्णपणे शिजवावे जेणेकरून त्यात असलेले कोणतेही संभाव्य जंतू नष्ट होतील. जोपर्यंत अंड्याचा पिवळ बलक आणि पांढरा भाग घट्ट आणि चांगला शिजलेला असतो, तोपर्यंत ते खाताना इन्फेक्शनचा धोका खूप कमी असतो. कारण त्यात असलेला कोणताही विषाणू जास्त तापमानात शिजवल्यास नष्ट होतो. तसेच , कच्च्या किंवा अर्धशिजवलेल्या अंड्यांचे सेवन केल्याने समस्या उद्भवू शकतात, कारण विषाणू कच्च्या अंड्यातील पिवळ बलकात जिवंत राहू शकतो.(Photo Credit : pexels )
जर आपण स्वयंपाक करण्यापूर्वी कच्चे चिकन साफ करत असाल तर संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ते स्वच्छ केल्यानंतर हात, भांडी आणि पृष्ठभाग चांगले धुणे महत्वाचे आहे. शिवाय, खाण्यासाठी ते चांगले शिजवणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा कोंबडी 165 डिग्री फॅ (74 डिग्री सेल्सियस) तापमानावर शिजवली जाते, तेव्हा कोंबडीतून एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरससह कोणतेही सूक्ष्मजीव काढून टाकले जातात.(Photo Credit : pexels )
याव्यतिरिक्त, जेव्हा दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांचा विचार केला जातो, तेव्हा पाश्चरायझेशनमुळे त्यांचे सेवन करणे सुरक्षित आहे. बर्ड फ्लूच्या विषाणूला निष्प्रभ करण्यासाठी दीर्घ कालावधीत केलेली उष्णता प्रक्रिया पुरेशी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतीही चिंता न करता दूध, चीज, दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू शकता. तसेच विश्वासू दुकानदारांकडून चिकन आणि अंडी खरेदी केल्यास बर्ड फ्लूच्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )