IPL 2023 : ''चाहत्यांचा मला निरोप देण्याचा प्रयत्न'', धोनीकडून पुन्हा एकदा निवृत्तीचे संकेत
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर (CSK vs KKR) महेंद्र सिंह धोनीला पाहण्यासाठी हजारो चाहते पोहोचले होते. चाहत्यांचं प्रेम पाहून धोनी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये कोलकाता (KKR) घरच्या मैदानावर चेन्नईने (CSK) दणदणीत विजय मिळवला.
ईडन गार्डन्स मैदानावर रंगलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी विजय मिळवला. कोलकाताच्या मैदानावर चाहत्यांनी चेन्नईला मोठा पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं.
ईडन गार्डन्स मैदानावर मोठ्या प्रमाणात येलो आर्मी दिसून आली. लाखो चाहते चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला पाहण्यासाठी आले होते.
कोलकाताच्या मैदानावर कोलकाता संघाच्या जर्सीपेक्षाही अनेक संख्येने चाहते चेन्नई सुपर किंग्स संघाची पिवळ्या रंगाची जर्सी घातलेले दिसून आले. जणू मैदानावर पिवळं वादळ आल्याची भावना निर्माण झाली होती.
कोलकाता विरुद्धच्या सामन्यादरम्यान चाहत्यांकडून धोनीच्या नावाने घोषणाबाजी सुरु होती. स्टेडिअममध्ये धोनी... धोनी... धोनी असा गजर सुरु होता.
चेन्नई संघाने 20 षटकात 235 धावांचा डोंगर रचला. चेन्नई संघाकडून तगडी फलंदाजी पाहायला मिळत होती, पण चाहत्यांना धोनीला खेळताना पाहायचं होतं.
चाहते धोनीची आतुरतेने वाट पाहत होते. हेच कारण आहे की, चाहत्यांनी धोनीला खेळण्यासाठी येण्यास भाग पाडलं.
यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी साधारणपणे सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. पण चाहत्यांसाठी धोनी या सामन्यात सहाव्या क्रमांकारवर फलंदाजीसाठी उतरला. या सामन्यादरम्यान, धोनीसाठी असलेलं चाहत्यांचं प्रेम दिसून आलं.
सामन्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना धोनी भावुक झाला. त्याने पुन्हा एकदा निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
धोनीने सामन्यानंतर चाहत्यांचे आभार मानले आणि म्हटलं की, 'चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी फक्त आभार मानू शकतो.
धोनी पुढे म्हणाला की, 'चाहते मोठ्या संख्येने आले आहेत. यातील बहुतेक लोक पुढच्या वेळी केकेआरच्या जर्सीमध्ये येतील. पण आज ते मला निरोप देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे चाहत्यांचे मनापासून आभार!'