Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : चेन्नई विरुद्ध गुजरात जंगी सामना; धोनी की पांड्या कोण ठरणार विजेता?
31 मार्च रोजी सुरु झालेल्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील आज अंतिम सामना रंगणार असून आज यंदाच्या मोसमाचा विजेता ठरणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदाबादमधील नरेंद्र मोंदी स्टेडिअमवर 28 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता महामुकाबला पाहायला मिळणार आहे.
दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली. आता अंतिम सामन्यात गुजरात टायटन्ससमोर महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान असेल.
गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघ आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहे.
आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीचा रणसंग्राम आज, 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.
सुमारे दोन महिन्यानंतर आज यंदाच्या हंगामातील अंतिम फेरी (IPL Final Match) पार पडणार आहे. गुजरातच्या (GT) होमग्राऊंडवर हा सामना रंगणार आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे. क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सने अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलच्या इतिहासात 10 व्यांदा अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. आजच्या अंतिम सामन्याकडे सर्वे क्रिकेट प्रेमींचं लक्ष्य लागलं आहे.
आज इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामातील अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. दरम्यान, 28 मे रोजी खेळवल्या जाणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट नाही, ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज अहमदाबादमधील सामन्यावेळी हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे.
रविवारी दिवसा अहमदाबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर, रात्री तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
आज अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता नसल्याने चाहते चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याचा पुरेपुर आनंद घेऊ शकतील.