Health Tips: आंबा न धुता खाल्ल्यास होऊ शकते 'हे' नुकसान
सध्या उन्हाळ्यासह आंब्यांच्या सीझन देखील सुरू आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे देखील उपलब्ध आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळ्यात चवदार, स्वादिष्ट आंबे खाण्याची एक वेगळीच मज्जा असते. यामुळे लहानांपासून मोठेही अगदी आवडीने आंबे खातात.
पण नेहमी आंबा धुवूनच खा असे का सांगितले जाते? आणि तसं न केल्यास काय नुकसान होऊ शकतं? याचा विचार कधी आलाय का?
तर, आंबा पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि धुवून घेतल्यास त्यावरील केमिकलचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे आंबा न भिजवता खाणं टाळा.
आंबा हा उष्ण असतो आणि त्यामुळे शरीरातही उष्णता वाढते आणि पचनसंस्था आणि आतड्यांवर परिणाम होतो. पण तो भिजवून खाल्ल्यास पोटाचा त्रास कमी होतो.
आंबा न भिजवता खाल्ल्यास वजन वाढू शकते, कारण त्यात फायटोकेमिकल असते जे वजन वाढवण्याचे काम करते.
आंबा पाण्यात न भिजवता खाल्ल्यास चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या देखील वाढते.
आंबा खाण्यापूर्वी भिजवण्यामागे केवळ केमिकल, घाण आणि धूळ काढणे एवढाच उद्देश नसतो. तो धुवून न घेतल्यास त्याची गुणवत्ता आणि चवही खराब लागते.
आंब्यामध्ये फायटिक ऍसिड नावाचा एक नैसर्गिक रेणू असतो, तो काढण्यासाठी आंबा धुवून घेतात.
आंबा न धुतल्यास त्याच्यावरील पावडरमुळे तुम्हाला मळमळ आणि उलटीची समस्या असू शकते.