IPL 2023 : अहमदाबादमध्ये 'येलो' वादळ! धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी, पिवळ्या रंगात न्हाऊन निघालं स्टेडिअम
आयपीएलच्या सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रविवारचा सामना रद्द झाला मात्र, सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येतने चाहते अहमदाबाद स्टेडिअममध्ये दाखल झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएलच्या सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रविवारचा सामना रद्द झाला मात्र, सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येतने चाहते अहमदाबाद स्टेडिअममध्ये दाखल झाले होते.
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये मोठ्या संख्येने चाहते पोहोचले होते.
नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी चाहत्यांची गर्दी पाहायली मिळाली. मोठ्या संख्येने चाहते धोनीला पाहण्यासाठी पोहोचले होते.
स्टेडिअमवर सर्वत्र 'येलो आर्मी' पाहायला मिळाली, जणू नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पिवळं वादळ पाहायला मिळालं. गुजरात टायटन्सचे चाहतेही संघाचा उत्साह वाढवण्यासाठी पोहोचले होते.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने पोहोचले होते. यावेळी क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक लाख 32 हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. हे संपूर्ण स्टेडिअम खचाखच भरलेलं पाहायला मिळालं. आजही मोठ्या प्रमाणाच गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
चेन्नई सुपर किंग्स लीग टप्प्यानंतर 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने क्वालिफायर-1 मध्ये गुजरात टायटन्सचा पराभव केला. चेपॉक येथे चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिला क्वालिफायर सामना खेळला गेला.
गुजरात टायटन्सने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवलं.
गुजरात टायटन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आणि चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या स्थानावर आहे.
रविवारी झालेल्या पावसामुळे अहमदाबादमधील (Ahmedabad Rain) नरेंद्र मोदी स्टेडियमवर 29 मे रोजी खेळवला जाणार आहे.