CSK vs GT : गुजरातचा चेन्नईवर विजय, कसा मिळवला गुजरातने विजय, वाचा 10 मुद्दे
यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 62 व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपरकिंग्सवर (CSK vs GT) 7 गडी राखून विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने केवळ 134 धावांचे माफक आव्हान गुजरातला दिले.
गुजरातच्या रिद्धिमान साहाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान 19.1 षटकात गुजरातने केवळ तीन गडी गमावून पूर्ण केले.
पहिली फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची सुरुवात खराब झाली अवघ्या 5 धावा करुन कॉन्वे बाद झाला.
गुजरातकडून ऋतुराज गायकवाडने 49 चेंडूत 53 धावांची खेळी करत एकहाती झुंज दिली.
गुजरातकडून मोहम्मद शामीने चार षटाकत फक्त 19 धावा खर्च करत महत्वाच्या दोन विकेट घेतल्या. याशिवाय हार्दिक पांड्याने दोन षटकात फक्त आठ धावा खर्च केल्या.
134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरात संघाने साहा आणि गिल जोडीच्या मदतीने चांगली सुरुवात केली.
पण पाथिराना याने गिलला 18 धावांवर बाद करत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर मोईनने मॅथ्यू वेडलाही 20 धावांवर बाद केलं. पण साहा दमदार खेळी करतच होता.
कर्णधार हार्दिक 7 धावा करुन बाद झाला पण मिलरने नाबाद 15 धावा ठोकत संघाचा विजय पक्का केला.
यावेळी साहा याने 57 चेंडूत नाबाद 67 धावा करत संघाला विजय मिळवून दिलं. साहाने यावेळी 8 चौकार आणि एक षटकार ठोकला.