IPL आधी गर्लफ्रेंडच्या आत्महत्या प्रकरणात अडकला, आता अभिषेक शर्मा चौकार-षटकारांचा पाडतोय पाऊस

सूरतची मॉडल तान्या सिंह हिने 19 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्याआधी तान्या सिंह हिने अभिषेक शर्माला अनेक मेसेज केले होते. पण अभिषेककडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नव्हता. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तान्या सिंह हिनं आयुष्य संपवल्यानंतर पोलिसांनी अभिषेक शर्माला चौकशीसाठी बोलवलं होतं. पोलिसांनी अभिषेक शर्माची कसून चौकशी केली होती. त्याला सहा तास पोलिस स्टेशनमध्येच थांबावं लागलं होतं. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

अभिषेक शर्माला कठीण परिस्थितीमधून जावं लागलं होतं. पोलिस अधिकाऱ्यांकडून अभिषेक शर्माची वारंवार चौकशी केली होती. पण या चौकशीमध्ये काय झालं, हे सार्वजनिक करण्यात आले नाही. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
सूरतची मॉडेल तान्य सिंह हिने 19 फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याआधी तान्या सिंह हिने अभिषेकला मेसेज केले होते. त्यामुळे तो पोलिसांच्या निशाण्यावर होता. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
अभिषेक शर्माने स्वत:ला सावरले. अभिषेक शर्माने आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी केली. शर्माने 12 सामन्यात 36 च्या सरासरीने 401 धावा केल्या आहेत. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
अभिषेक शर्माने आयपीएलमध्ये 59 सामन्यात 153 सामन्यात 1293 धावा चोपल्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये नऊ घेतल्या आहेत. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)