Sandeep Sharma : सनरायझर्स हैदराबादच्या स्टार गोलंदाजानं बांधली लग्नगाठ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा गोलंदाज संदीप शर्मानं आपली लग्नगाठ बांधली आहे. त्यानं आपली गर्लफ्रेंड ताशा सात्विक (Tasha Sathwik) हिच्याशी आपली लग्नगाठ बांधली आहे. (PHOTO : Twitter/SRH)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा यानं आपली लग्नगाठ बांधली आहे. संदीपच्या आयपीएल फ्रेंचायझीनं या नवविवाहीत जोडप्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. फ्रेंचायझीनं संदीपची पत्नीचं सनरायझर्सच्या कुटुंबात स्वागत केलं आहे. (PHOTO : Instagram)
संदीप आणि ताशा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. आयपीएलमध्येही दोघं एकत्र दिसून आले होते. सोशल मीडियावर यापूर्वीही संदीपनं ताशासोबत काही फोटो शेअर केले होते. (PHOTO : Twitter/SRH)
संदीप शर्माची पत्नी ताशा सात्विक बंगळुरुमध्ये राहते. ती ज्वेलरी डिझायनर आहे. याव्यतिरिक्त ती ब्लॉगिंगही करते. संदीप आणि ताशा या दोघांनी साधारणतः तीन वर्षांपूर्वीच साखरपुडा केला होता. (PHOTO : Instagram)
वेगवान गोलंदाज संदीपचं लक्ष्य IPL-2021 च्या दुसऱ्या टप्प्यात वापसी करण्याचं असेल. संदीपची 2015 झिंबाब्वे दौऱ्यावर टीम इंडियामध्ये निवड झाली होती. त्यावेळी त्यानं 2 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु, त्यावेळी तो केवळ एकच विकेट घेऊ शकला. टी20 मध्ये संदीपच्या नावावर 143 सामन्यांमध्ये 159 विकेट्स नोंदवले गेले आहेत.
संदीप पहिल्यांदा आयपीएल 2018 च्या लिलावात 3 कोटी रुपयांमध्ये ऑरेंज आर्मीमध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासूनच तो सनरायझर्स हैदराबादचा हिस्सा आहे. आतापर्यंत संदीपनं सनरायझर्ससाठी 39 विकेट्स घेतले आहेत.
(photo courtesy : @thesandeepsharma instagram)
(photo courtesy : @thesandeepsharma instagram)
(photo courtesy : @thesandeepsharma instagram)