Bollywood : मलायका-अरबाज ते हृतिक-सुझानपर्यंत, 'या' कलाकारांचं घटस्फोटानंरही नातं कायम
Malaika Arora-Arbaaz Khan पासून ते Hrithik Roshan-Susanne Khan पर्यंत असे काही कलाकार आहेत ज्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला आहे. मात्र घटस्फोटानंतरही त्यांच्यातील एक वेगळं नातं अजूनही कायम आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऋतिक रोशन-सुझान खान: ऋतिक रोशन आणि सुझान खाननं 2014 मध्ये 14 वर्ष संसार केल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पती पत्नीचं नातं संपल्यानंतरही त्या दोघांमध्ये आजही एक वेगळं बॉन्डिंग आहे. आपल्या मुलांसाठी ते एकत्र येत असतात.
आमिर खान-किरण राव: आमिर खान आणि किरण राव यांनी नुकताच घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोटानंतरही ते सोबत आहेत.
सैफ अली खान-अमृता सिंह: सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्यातील नातं तुटल्यानंतर ते देखील आपल्या मुलांसाठी एकत्र येताना पाहायला मिळाले आहेत.
फरहान अख्तर-अधुना भबानी: फरहान आणि अधुना यांनी 16 वर्षांच्या संसारानंतर परस्पर सहमतीनं घटस्फोट घेतला. आपल्या दोन मुलींसाठी ते अजूनही एकमेकांशी जुळलेले आहेत.
मलायका अरोरा-अरबाज खान: मलायका अरोरा आणि अरबाज खाननं 2017 मध्ये परस्पर सहमतीनं घटस्फोट घेतला. आपलं 19 वर्षांचं लग्न त्यांनी मोडलं. मात्र लग्नानंतरही ते दोघं कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये भेटत असतात.