In Pics | 'धकधक गर्ल' माधुरीच्या या आहेत काही ऑनस्क्रीन दिलखेचक अदा

Feature_Photo_1
1/7
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी तिचं स्टारडम कायम आहे. तिच्या आयकॉनिक ऑनस्क्रीन लूकमुळे तिची बॉलिवूडवर भूरळ कायम आहे. माधुरी तिच्या दिलखेचक अदांसोबत तिच्या डान्सबद्दलही ओळखली जाते. हम आपके है कोण, दिल तो पागल है, देवदास, तेजाब असे अनेक सुपर हिट पिक्चर्स माधुरीने दिले आहेत.
2/7
'सैलाब' या चित्रपटातील माधुरीचा जलवा आजही अनेकांच्या लक्षात आहे. 'हमको आजकल है इंतजार' या गाण्यावरील तिचा डान्स आणि तिची अदा याला तोड नाही.
3/7
'तेजाब' चित्रपटातील 'एक,दोन तीन' या गाजलेल्या गाण्यावरील तिचा डान्स हा अप्रतिम होता. या गाण्यात ती पिंक रंगाच्या स्कर्टमध्ये दिसते.
4/7
'हम आपके है कोण' या चित्रपटातील माधुरीचा ब्लू साडीतील लूक कोण विसरणार? या चित्रपटामुळे माधुरीच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली.
5/7
'दिल तो पागल है' या चित्रपटात माधुरी थोडी वेस्टर्न लूकमध्ये दिसून आली. तिचा हा अंदाज चाहत्यांना खूप पसंत आला.
6/7
90 च्या दशकातील गाजलेल्या 'बेटा' या चित्रपटात ती अनिल कपूरसोबत दिसून आली होती. या चित्रपटातील 'धक धक करणे लगा' या गाण्यावर तिने अप्रतिम डान्स केला आहे.
7/7
'देवदास' या चित्रपटात माधुरी मुख्य भूमिकेत दिसून आली. तिचा अनारकली ड्रेसमधील लूक आजही अनेक चाहत्यांना घायाळ करतोय.
Published at : 09 Apr 2021 09:09 AM (IST)