Commonwealth Games 2022 : भारतीय हॉकीपटू कॉमनवेल्थसाठी सज्ज, कसून सुरु आहे मैदानावर सराव
कॉमनवेल्थ खेळांसाठी भारतीय खेळाडू इंग्लंडच्या बर्मिगहममध्ये पोहोचले असून सरावही सुरु केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय पुरुष हॉकी संघ आणि महिला हॉकी संघ सध्या कसून सराव करत आहे.
संघाचे हे सराव करतानाचे फोटो एएनआय वृत्तसंस्थेने देखील शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये भारतीय खेळाडू आपआपसात सामना खेळत असल्याचं दिसत आहे.
कॉमनवेल्थ खेळांमध्ये यंदा भारताला हॉकीमध्ये पदक मिळण्याची आशा आहे. कारण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही गटांनी उत्तम कामगिरी केली होती.
1930 पासून सुरू झालेल्या कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत भारत 18 व्या वेळेस सहभागी होईल.
यावर्षी 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडूंसह भारत एकूण 15 खेळांमध्ये दम दाखवणार आहे.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंनी सहभाग घेतलाय. दरम्यान, पीव्ही सिंधु (PV Sindhu), मीराबाई चानू (Mirabai Chanu), रवि दहिया (Ravi Dahiya), निकहत जरी (Nikhat Zareen) आणि मनिका बन्ना (Manika banna) यांच्याकडून सुवर्णपदाकाची अपेक्षा केली जात आहे.
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रासह (Neeraj Chopra) याने दुखापतीमुळे नुकतीच स्पर्धेतून माघार घेतली.