Ravindra Jadeja : 'सर' रविंद्र जाडेजाचं शानदार शतक; अश्विनसोबतच्या भागिदारीनं भारत भक्कम स्थितीत
IND vs SL, 1st Test, Mohali: मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने दमदार खेळी करत शतक पूर्ण केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या भारताच्या 7 विकेटच्या मोबदल्यात 465 धावा झाल्या आहेत. जडेजा 102 धावांवर खेळत असून त्याच्याबरोबर जयंत यादव खेळत आहे.
अश्विन आणि रविंद्र जाडेजानं शतकी भागिदारी करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे
अश्विन 61 धावांवर बाद झाला.
रविंद्र जाडेजानं आपल्या कसोटी कारकिर्दीतलं दुसरं शतक झळकावलं.
जाडेजा आणि अश्विनच्या भागिदारीनं भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
आजच्या दिवशीचा खेळ सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली
सर्व खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधली होती.