Rice Price : वर्षभरात तांदळाच्या किमंतीत 15 टक्क्यांची वाढ
तांदळाच्या दरात सातत्यानं वाढ (Rice Price Hike) होत आहे. सध्या तांदळाला प्रचंड मागणी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतांदळाच्या किंमतीने मागील 15 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळं तांदळाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
आशियाई आणि आफ्रिकन खंडातील देशांमध्ये, तांदूळ हे लोकांच्या ताटातील मुख्य अन्न आहे. मात्र, तांदळाच्या महागाईनं आधीच लोकांच्या अडचणी वाढवल्या असून, आगामी काळात तांदूळ आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतानं तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळं भारतानं तांदळावर घातलेली निर्यातबंदी आणि थायलंडमध्ये भात पिकाचे झालेले नुकसान हे तांदळाच्या किंमती वाढण्याचे मुख्य कारण आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये किंमतीत नरमाई दिसून आली होती. परंतू नोव्हेंबरपासून किमतींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. एल निनोमुळं आशिया खंडातील भात पिकांना मोठा फटका बसला आहे.
भारतातही तांदळाच्या किंमती वाढल्यानं सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यानंतर नुकतेच सरकारनं तांदूळ कारखान्यांना तांदळाच्या किंमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी चार महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत तांदळाचे दर वाढल्याने सरकारही चिंतेत आहे.
ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत निरीक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात तांदळाच्या किंमतीत सुमारे 15 टक्क्यांची वाढ झाली आहे.
21 डिसेंबर 2022 रोजी तांदळाची किरकोळ किंमत 37.99 रुपये प्रति किलो होती. जी 20 डिसेंबर 2023 रोजी वाढून 43.51 रुपये प्रति किलो झाली.