In Pics : हॉकी विश्वचषकात भारताची विजयी सुरुवात, स्पेनला 2-0 ने दिली मात
यंदा भारतीय भूमीत होणाऱ्या हॉकी विश्वचषकाची सुरुवात भारताने विजयाने केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय हॉकी संघाने विश्वचषकाच्या सलामनीच्या सामन्यात स्पेनवर 2-0 ने विजय मिळवला आहे.
यंदा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असताना भारताने विजयाने स्पर्धेची सुरुवात केल्याने भारतीय संघाचं कौतुक होत आहे.
सलामीच्या सामन्यात भारताच्या विजयाने भारतीय हॉकी चाहतेही सुखावले आहेत.
सामन्यात सुरुवातीपासून भारतीय संघानं आपलं वर्चस्व ठेवलं होतं.
सामन्यात भारतासाठी अमित रोहिदास आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.
भारतीय चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात भारताच्या सामन्याला सपोर्ट करण्यासाठी मैदानात उपस्थित दर्शवली होती.
भारत असणाऱ्या D गटात भारताने विजय मिळवत चांगली आघाडी घेतली आहे. या गटात भारतासह इंग्लंड, स्पेन आणि वेल्स असे दमदार संघ आहेत.
भारताशिवाय या गटातील इंग्लंड आणि वेल्स यांचाही आज सामना झाला ज्यात इंग्लंडने 5-0 असा दमदार विजय मिळवला.
भारताचा यानंतरचा सामना रविवारी अर्थात 15 जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध असणार आहे. आजप्रमाणेच सायंकाळी 7 वाजता हा सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.