In Pics : अथक परिश्रम अन् मेहनतीच्या जोरावर मेस्सीनं साकार केलं स्वप्न, अखेर उंचावला फिफा विश्वचषक
फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फुटबॉल इतिहासातील एक सर्वात रोमहर्षक असा सामना पाहायला मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधी अतिरिक्त वेळ त्यानंतर पेनल्टी शूटआऊट असं सारंकाही असणाऱ्या या सामन्यात पेनल्टी शूटआऊट झालं. ज्यामध्ये अर्जेंटिना संघाने फ्रान्सवर 4-2 असा विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला.
आणि संपूर्ण कारकिर्द फिफा विश्वचषकाची वाट पाहिलेल्या मेस्सीनं अखेर आपलं आणि देशाचं स्वप्न पूर्ण करत फिफा वर्ल्ड कप उंचावला.
विशेष म्हणजे ज्या मेस्सीसाठी अर्जेंटिनाला हा कप जिंकायचा होता, त्या मेस्सीनेच सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पेनल्टी शूटआऊटमधील गोल पकडून एकून तीन गोल मेस्सीनं केले.
विशेष म्हणजे अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलानो मार्टिनेज याने उत्कृष्ट खेळ दाखवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी निभावली.
विशेष म्हणजे फ्रान्सचा 23 वर्षीय स्टार फुटबॉलपटू कायलिन एम्बाप्पे याने देखील कडवी झुंज देत हॅट्रिक केली, एकूण चार गोल करत त्यानं अखेरपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले, पण तो जिंकू शकला नाही.
अतिरिक्त वेळेनंतर पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. फायनलच्या या पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलकिपर एमिलानो मार्टिनेज याने आपली जबाबदारी चोखरित्या पार पाडली.
अर्जेंटिनाच्या स्ट्रायकर्सने देखील एकही संधी व्यर्थ न घालवत एक किक राखून 4-2 ने पेनल्टी शूटआऊट जिंकला आणि सामन्यासह विश्वचषक 2022 अर्जेंटिनाला जिंकवून दिला.
त्यामुळं वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी एका गंभीर आजारानं ग्रासलेल्या मेस्सीनं खडतर प्रवास करत अखेर विश्वचषक जिंकत कारकिर्दीची हॅपी एडिंग केली आहे.
क्लब फुटबॉल गाजवून अर्जेंटिनाला जागतिक फुटबॉलमध्ये अव्वल दर्जाचा संघ बनवण्यापासून विश्वचषक विजयापर्यंतचा मेसीचा प्रवास खरचं वाखाणण्याजोगा आहे.