In Pics : विजय बारसेंचा शिष्य थेट कतारला, स्लम सॉकरमधील स्टार फुटबॉलर शुभम पाटीलला फिफाचं आमंत्रण, पाहा फोटो
फिफा फुटबॉल विश्वचषक आजपासून सुरु होत आहे. कतारमध्ये यंदा ही स्पर्धा पार पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया भव्य क्रीडा आयोजनात फिफाने नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची आठवण आवर्जून ठेवली आहे.
स्लम सॉकरच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलपटू बनवण्याचा काम गेले अनेक दशकं विजय यांनी केलं असून आता फिफा ने बारसेंच्या एका शिष्याला विश्वचषक पाहण्यासाठी थेट कतारला आमंत्रित केलं आहे.
स्लम सॉकरच्या माध्यमातून फुटबॉलपटू बनलेला शुभम पाटील हा तरुण विजय बारसे यांच्या स्लम सॉकर चा प्रतिनिधित्व करत फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला गेला आहे. '
फिफा एक जगातील श्रीमंत संघटना असली, तरी फुटबॉल मुळात गरीबांचा खेळ आहे, असं बारसे यांनी म्हटलं आहे.
तसंच फिफाने स्लम सॉकर खेळणाऱ्या गरीब मुलांची आठवण ठेवली आहे. हेच महत्त्वाचे आहे,'' असं मत विजय बारसे यांनी व्यक्त केलं आहे.
शुभम पाटील अत्यंत गरीब घरातून आला असून फुटबॉलच्या माध्यमातून त्याने आपले जीवन नव्याने उभारले आहे.
आता तो विश्वचषक पाहण्यासाठी कतारला जाणार असून ही त्याच्यासह सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
फिफा विश्वचषकाचे ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील.
3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल