Fifa World Cup 2022 Final : मेस्सी उंचावणार वर्ल्ड कप? अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स रंगणार फिफा विश्वचषकाची फायनल!

कतारमध्ये सुरु फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2022 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आता फायनलचा सामना 18 डिसेंबर रोजी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स असा रंगणार आहे.

अर्जेंटिना संघाने क्रोएशियाला सेमीफायनलमध्ये 3-0 ने मात देत फायनल गाठली आहे.
तर फ्रान्स संघाने मोरोक्कोला 2-0 ने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
आता 18 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता फायनलचा सामना रंगणार आहे.
संपूर्ण फुटबॉल जगत या सामन्याकडे लक्ष लावून आहे, कारण स्टार फुटबॉलर मेस्सीचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो, तो निवृत्ती घेण्याच्या चर्चा आहेत.
त्यामुळे अखेरचा विश्वचषक तरी मेस्सी जिंकणार का? हे पाहावं लागेल.
दुसरीकडे याआधीचा 2018 चा विश्वचषक विजेता फ्रान्सचा संघही फायनलमध्ये आहे.
त्यामुळे अर्जेंटिनांला मात देऊन फ्रान्स विश्वचषक स्वत:कडेच ठेवणार का? हे देखील पाहावं लागेल.
याशिवाय मोरोक्को आणि क्रोएशिया हे संघ 17 डिसेंबरला तिसऱ्या स्थानासाठी एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरतील.