Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोलंदाजांनी आधी रोखले, फलंदाजांनी नंतर चोपले, पहिल्याच सामन्यात इंग्लंडला पराभवाचा धक्का
सलामीचा डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रनं झळकावलेल्या खणखणीत नाबाद शतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं आयसीसी वन डे विश्वचषकात दणदणीत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडनं सलामीच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा नऊ विकेट्स आणि 82 चेंडू राखून धुव्वा उडवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appन्यूझीलंडनं या विजयासह गत विश्वचषकाच्या फायनलमधल्या तांत्रिक पराभवाचा वचपा काढला. आजच्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडला नऊ बाद 282 धावांत रोखलं होतं. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रनं दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची अभेद्य भागीदारी रचून न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
image 3
कॉनवेनं 19 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 152 धावांची, तर रवींद्रनं 11 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 123 धावांची खेळी उभारली. त्याआधी, न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीनं तीन, तर मिचेल सॅन्टनर आणि ग्लेन फिलिप्सनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
image 5
झीलंडच्या गोलंदाजांनी आधी इंग्लंडच्या फलंदाजांना रोखले, त्यानंतर फलंदाजांनी इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. इंग्लंडने दिलेले 283 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 9 विकेट आणि 82 चेंडू राखून सहज पार केले. न्यूझीलंडकडून सलामी फलंदाज डेवेन कॉन्वे याने दीडशतक ठोकले, तर युवा फलंदाज रचित रविंद्र याने वादळी शतकी खेळी केली.
विश्वचषक 2023 च्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा पराभव करत न्यूझीलंडने 2019 चा वचपा काढला. 2019 च्या विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत चषक उंचावला होता. 2019 च्या विश्वचषकात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. पण सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती. त्यानंतर इंग्लंडचे चौकार जास्त असल्यामुळे त्यांना विजेते घोषीत करण्यात आले. हाच पराभव न्यूझीलंडच्या प्रत्येकाच्या मनाच सल करुन बसला होता. आता या पराभवाची परतफेड न्यूझीलंडने केली आहे.
इंग्लंडने दिलेल्या 283 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. संघाच्या अवघ्या दहा धावा झाल्या तेव्हा सलामी फलंदाज विल विंग शून्यावर तंबूत परतला होता. त्यामुळे गतविजेते न्यूझीलंडवर भारी पडणार का? असा सवाल उपस्थित झाला होता.
पण युवा फलंदाज रचित रविंद्र याने डेवेन कॉन्वे याला चांगली साथ दिली. दोघांनी इंग्लंडच्या फलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी 273 धावांची विक्रमी भागिदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.