World Cup 2023 : अफगाणिस्तानच्या संघाची जबाबदारी अजय जाडेजांवर, विश्वचषकात करणार संघाला मार्गदर्शन
5 ऑक्टोबर 2023 पासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये दहा संघांचा समावेश असणार आहे.
त्यामुळे प्रत्येक संघाकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आलीये.
याचदरम्यान आफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
भारताचे माजी खेळाडू अजय जाडेजा यांच्यावर आफगाणिस्तानच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आलीये.
आफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने 52 वर्षीय स्टार ऑलराऊंडर खेळाडू अजय जाडेजा यांना संघाच्या मार्गदर्शक पदी नियुक्त केलं आहे.
जाडेजा यांनी 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली आहे.
तर जाडेजाने त्याच्या कारकिर्दीमध्ये एकूण 196 सामने खेळले ज्यामध्ये विश्वचषकाचा देखील समावेश आहे.
त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये 5359 धावांचा विक्रम केला आहे.
तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 20 विकेट्स देखील घेतल्या आहेत.