Womens T20 World Cup 2024: लढले, जिंकले, रडले...; न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या, दक्षिण अफ्रिकेचं पुन्हा स्वप्न भंगलं
अमेलिया केर हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने दक्षिण आफ्रिका संघावर 32 धावांनी मात करताना पहिल्यांदाच आयसीसी महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. (photo credit-icc)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडने 20 षटकांत 5 बाद 158 धावा केल्या. (photo credit-icc)
दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 9 बाद 126 धावांवर रोखत न्यूझीलंडने विजय साकारला, अमेलिया केर सामनावीर आणि मालिकावीर किताबाची मानकरी ठरली. (photo credit-icc)
विजयासाठी 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वोल्वार्ड (33) आणि तजमीन ब्रिट्स (17) यांनी 51 धावांची सलामी देत शानदार सुरुवात करून दिली. (photo credit-icc)
फ्रान जोनास हिने ब्रिट्सला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर केरने वोल्वार्डला बाद करत द. आफ्रिकेची बिनबाद 51 वरून दोन बाद 59 अशी अवस्था केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेल्या. (photo credit-icc)
क्लो ट्रायॉन (14), एनेरी डर्कसेन (10) यांनी झुंज दिली, पण शेवटच्या षटकात 38 धावांचे लक्ष्य द. आफ्रिकेला पेलवले नाही. (photo credit-icc)
न्यूझीलंडकडून रोजमेरी मेयर, अमेलिया केर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर ईडन कार्सन, फ्रान जोनास, ब्रुक हॉलिडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (photo credit-icc)
अंतिम सामन्याच्या काही तास आधी सूजी बाइट्सने स्वत:सह कर्णधार सोफी डेव्हाईन आणि ली ताहिहू यांचा 'आज्या' असा उल्लेख केला होता, (photo credit-icc)
न्यूझीलंडने विश्वचषक पटकावल्यानंतर सूजी बाइट्सच्या विधानाची खूप चर्चा झाली. (photo credit-icc)
दक्षिण आफ्रिकेला महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. या वर्षी जूनमध्ये झालेल्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला होता. (photo credit-icc)