In Pics : महिला टी20 विश्वचषकाची उत्सुकता शिगेला, ट्रॉफीसोबत खेळाडूंचं खास फोटोशूट
भारतीय सीनियर महिला संघाचे खेळाडू महिला टी-20 विश्वचषक 2023 खेळण्यासाठी लवकरच मैदानात उतरत आहेत. स्पर्धेपूर्वी विविध संघातील कर्णधार आणि खेळाडूंनी खास फोटोशूट केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वच देशाच्या कर्णधार यावेळी ट्रॉफीसोबत खास अंदाजात दिसून आल्या, त्यांनी सर्वांनी आपल्या संघासोबत तसंच फक्त कर्णधारांनीही फोटो पोस्ट केले आहेत.
भारताची महिला स्टार सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्स हीची या फोटोशूटमध्ये वेगळीच स्टाईल पाहायला मिळाली.
नुकतीच अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विजेतेपद पटकावलं. भारतीय संघानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून ट्रॉफी जिंकली.
ज्यानंतर आता भारतीय सीनियर महिला संघाचे खेळाडू महिला टी-20 विश्वचषक 2023 खेळण्यासाठी मैदानात उतरत आहेत.
हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे,
भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात T20 त्रिकोणी मालिका खेळवली गेली ज्याच्या अंतिम सामन्यात भारत 5 विकेट्सने पराभूत झाल्यामुळे मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकली.
पण आता महिला टी20 विश्वचषक स्पर्धा मात्र जिंकण्यासाठी भारतीय महिला शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी सर्वच खेळाडू सज्ज झाले आहेत.
स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्याने भारत स्पर्धेची सुरुवात करेल.
या विश्वचषकात 10 संघ सहभागी होत असून, त्यांना दोन गटात ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गटातील एक संघ त्यांच्या गटातील इतर चार संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. दोन्ही गटातील अव्वल 2-2 संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील. 10 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान गट टप्प्यातील सामने खेळवले जातील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होतील.