Rohit Sharma : रोहित शर्मा मैदानावर खेळाडूंना शिव्या का देतो? स्वत: केला मोठा खुलासा
रोहित शर्माला मैदानात आणि मैदानाबाहेर रागाच्या भरात अपशब्द वापरण्याची सवय आहे हे सर्वांनाच माहिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक वेळा तो रागाच्या भरात खेळाडू आणि चाहत्यांना शिवीगाळ करतो.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्येही असेच काहीसे दिसून आले, जेव्हा रोहितने मैदानाच्या मध्यभागी कुलदीपला फटकारले.
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा विजेता बनवल्यानंतर रोहितने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना नवा खुलासा केला आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, 'कधीकधी मी मैदानावर भावनिक होतो आणि मैदानावर काही कठोर शब्दही बोलतो, पण हेतू कोणालाही दुखावण्याचा नसतो.
रोहित पुढे म्हणाला, मी मैदानावर त्यांना काही बोललो तरी त्यांना माहित असते की, मी ते त्यांच्या आणि संघाच्या भल्यासाठीच बोलत आहे.
हिटमन पुढे म्हणाला, सर्व मला समजतात, जर मी एखाद्या विशिष्ट षटकात कोणावर ओरडलो असेल तर त्यांना माहित आहे की ते फक्त त्या षटकासाठी आहे.
हिटमन शेवट म्हणाला की, मी लगेच ते विसरून जातो आणि पुढे जातो. हो, अशा गोष्टी घडतात आणि त्या मजेदार असतात.
अलिकडेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अपराजित राहिला आणि विजेतेपद जिंकले.