MS Dhoni : जगातला सर्वात बेस्ट फिनिशर असलेला धोनी कोणत्या दोन गोलंदाजांना घाबरतो? स्वत: दिली कबुली, म्हणाला...
महेंद्रसिंग धोनीने त्याच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज गोलंदाजांना गगनचुंबी षटकार मारले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाहीची गणना क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये होते.
पण कोणत्या गोलंदाजाने माजी भारतीय कर्णधाराला सर्वात जास्त त्रास दिला आहे? हे तुम्हाला माहित आहे का?
खरंतर, माहीने मास्टरकार्ड इंडियाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
त्याने हे देखील सांगितले की, त्याला कोणत्या गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करणे सर्वात कठीण जात होते?
या प्रश्नाच्या उत्तरात माहीने दोन गोलंदाजांची नावे घेतली.
माहीने वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांना सर्वात घातक गोलंदाज म्हटले.
माहीच्या मते, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांच्याविरुद्ध फलंदाजी करणे खूप कठीण आहे.
वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहेत.