History of Test cricket : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात पहिला बॉल कोणी टाकला? पहिला फलंदाज कोण?

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला सामना 15 मार्च 1877 रोजी खेळवण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इतिहासातील पहिला कसोटी सामन्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमने सामने आले होते.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळवण्यात आला होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल होता.
फिरकीपटू आल्फ्रेड शॉ यांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला बॉल टाकला होता.
आल्फ्रेड शॉ यांनी टाकलेला हा बॉल चार्ल्स बेन्नरमन यांनी फेस केला होता.
चार्ल्स बेन्नरमन यांनीच कसोटी क्रिकेटमध्ये पहिला रन काढला होता.
इंग्लंडच्या अॅलन हेल यांनी कसोटी क्रिकेटमधील पहिली विकेट आणि पहिला कॅच पकडत इतिहास रचला होता.
सध्याच्या घडीला क्रिकेटने मोठी लोकप्रियता मिळवलीये.
भारतात क्रिकेटला मोठा प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतो.