जेम्स अँडरसनची अखेरची कसोटी, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी केली मोठी चूक पण थोडक्यात निभावलं, नेमकं काय घडलं?
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात लॉर्डसवर पहिली कसोटी सुरु होती. इंग्लंडनं एक डाव 114 धावांनी ही मॅच तिसऱ्या दिवशी जिंकली.तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी इंग्लंडच्या संघानं जेम्स अँडरसनला गार्ड ऑफ ऑनर दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेम्स अँडरसनची ही शेवटची कसोटी मॅच होती. या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ देखील जेम्स अँडरसनला गार्ड ऑफ ऑनर देणार होता. मात्र, वेस्ट इंडिजचा संघ गार्ड ऑफ ऑनर देण्यास विसरला.
वेस्ट इंडिज विरुद्ध जेम्स अँडरसन अकराव्या स्थानावर फलंदाजीसाठी मैदानात आला होता. वेस्ट इंडिजच्या संघान शोएब बशीरला बाद केल्यानंतर अँडरसन फलंदाजीसाठी मैदानात आला होता.
वेस्ट इंडिजचे खेळाडू शोएब बशीरच्या रन आऊटचा आनंद साजरा करत होते. या दरम्यान जेम्स अँडरसन फलंदाजीसाठी मैदानात आला आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंपासून दूर जाऊन उभा राहिला.
वेस्ट इंडिजचा खेळाडू जेसन होल्डर यानं संघाला वाचवलं. जेसन होल्डरनं जेम्स अँडरसन जवळ जाऊन हाथ मिळवला. त्यामुळं वेस्ट इंडिजचा संघ थोडक्यात बचावला.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडन सील्सनं मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला जेम्स अँडरसन बॅटिंगला येईल त्यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार होता. मात्र, शोएब बशीरच्या विकेटच्या सेलिब्रेशनमध्ये दुर्लक्ष झालं. अँडरसन देखील दूर उभा राहिला होता. त्यामुळं गार्ड ऑफ ऑनर देणं शक्य झालं नाही, असं जेडन सील्स म्हणाला.