In Pics : कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपला, कोहलीनं 1205 दिवसानंतर ठोकलं टेस्ट शतक
स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळानंतर शतक ठोकत पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसह भारतीय क्रिकेट फॅन्सना खुश केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App241 चेंडूत कोहलीनं शतक ठोकलं असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ अडचणीत असताना हे शतक ठोकत विराटनं संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे.
विराटच्या कारकिर्दीतील हे 75 वं शतक असून 28 वं कसोटी शतक आहे.
जवळपास 3 वर्षानंतर म्हणजे 1205 दिवसानंतर कोहलीनं कसोटी शतक ठोकलं आहे.
याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीनं बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं.
त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटनं केवळ 5 चौकार ठोकत हे शतक केलं आहे. एकही षटकार त्यानं आज ठोकलेला नाही. दरम्यान 2019 साली कसोटी फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही गेल्या 20 कसोटी डावांमध्ये खूपच खराब होती. ज्यामध्ये त्याने केवळ 25 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटने फक्त एकदाच 50 हून अधिक धावांची खेळी पाहिली होती, जी डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान आली होती.
पण आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकल्यावर विराट पुन्हा फॉर्मात परतेल अशी आशा फॅन्सना आहे.
याच सामन्यात विराट कोहलीने कांगारुच्या पहिल्या डावात नॅथन लियॉनचा झेल घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 300 झेल पूर्ण केले आहेत.
विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीतील एकदिवसीय-कसोटी आणि टी-20 सह 494 वा सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 299 झेल घेतले होते. पण आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 झेल पूर्ण झाले आहेत. 300 झेल पूर्ण होताच विराट कोहलीने कॅचचं त्रिशतक पूर्ण केले आहे. अश्विनच्या चेंडूवर त्याने स्लिप्समध्ये नॅथन लायनचा अप्रतिम झेल घेतला. अहमदाबाद कसोटीत त्याने ही कामगिरी केली. 300 झेल घेणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
त्याच्या आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली होती. द्रविडने 334 झेल घेतले आहेत. सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट कोहली सातव्या स्थानावर आहे.