Jotiba Yatra : जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेसाठी जोरदार तयारी सुरु; 5 एप्रिल यात्रेचा मुख्य दिवस
जोतिबा देवाची चैत्र यात्रा काही दिवसांवर आल्याने यात्रेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन जेसीबीच्या सहाय्याने वाहनतळ सपाटीकरणाचे काम सुरू आहे.
विक्रमी गर्दीची शक्यता लक्षात घेता यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत.
कामदा एकादशीपासून डोंगरावर राज्यभरातून भाविक येण्यास सुरुवात होईल.
यात्रेचा मुख्य दिवस 5 एप्रिल आहे.
जोतिबा, महादेव, नंदी, चोपडाईदेवी, काळभैरव या मंदिरांच्या शिखरांच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे तयारीच्या पाहणीसाठी दोन दिवसांत जोतिबा डोंगरावर येणार आहेत.
देवस्थान समितीने मंदिर परिसर मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू केले असून डागडुजी सुरू आहे.
पोलिस यंत्रणेने बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.
पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे.