In Pics : विराट कोहलीनं पत्नी अनुष्कासह मुलगी वामिकासोबतचा खास फॅमिली फोटो केला शेअर, खास कॅप्शनही दिलं
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधी ऑनफिल्ड खेळामुळे तर कधी ऑफफिल्ड गोष्टींमुळे अनेकदा चर्चेत असतो.
जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. हे सर्व चाहते त्याला सोशल मीडियावरही फॉलो करतात.
त्यामुळे त्याचे इन्स्टा फॉलोवर्सही मोठ्या प्रमाणात असून सर्वाधिक इन्स्टा फॉलोवर्स असणारा क्रिकेटर तो आहे.
अशामध्ये त्याने केलेली कोणतीही पोस्ट व्हायरल होतच असते.
आतातर त्याने फॅमिलीसोबत एक खास फोटो शेअर केला आहे. विराटने अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबतचा एक छान फोटो शेअर केला आहे.
ज्याला सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे.
विराटने पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबतचा शेअर केलेला फोटो एका समुद्रकिनारचा आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये किंग कोहलीने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद दिल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत.
पोस्टमध्ये त्याने आपल्या कारकिर्दीत जे काही मिळवले त्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले आहेत. पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासोबत बीचवर फिरताना त्याचा हा फोटो पाठीमागून टिपण्यात आला आहे.