Nashik News : नाशिक जिल्ह्यावर शोककळा, जवान आदित्य जाधव यांचे मनात घर करणारे फोटो
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावचे जवान आदित्य जाधव जम्मू काश्मीरमध्ये निधन झाल्याची घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येत सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या निधनानंतर माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह तालुक्यातील जनतेने श्रद्धांजली अर्पण केली.
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील सैन्य दलातील जवान आदित्य अशोक जाधव यांचा निधन झाल्याची माहिती पोलीस पाटील व नातलगांना मिळाली.
जवान आदित्य जाधव यांचे पार्थिव उद्या उशिरापर्यंत निळवंडी गावात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. निळवंडी येथील आदित्य अशोक जाधव हा सैन्य दलात लढाक येथे कार्यरत होता.
या जवानाचे निधन झाल्याची माहिती शनिवारी रात्री संबंधित विभागाकडून दूरध्वनी द्वारे त्याच्या नातेवाईक व पोलीस पाटील यांना प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे निळवंडी मध्ये दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर सुखकळा पसरली आहे.
दरम्यान मागील महिन्यात 30 डिसेंबर रोजी सुट्टी संपून आदित्य जाधव लडाखला परतला होता. त्यानंतर नऊ दिवसांनी त्याच्या निधनाची वार्ता आल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला आहे.
दरम्यान जाधव यांचा मृत्यू कसा झाला? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकले नाही. मात्र त्यांची पार्थिव उद्या निळवंडी गावात येणार आहे.
त्यानंतर त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
डिसेंबर महिन्यात नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवासी जनार्दन उत्तम ढोमसे यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले होते.
त्यानंतर डिसेंबर महिन्यातच सटाणा येथील भूमिपुत्र सारंग अहिरे हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले होते.