रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याचा वाद मिटवण्यात कोहली-द्रविडची मोठी भूमिका; नेमकं काय केलं?
आयपीएल 2024 दरम्यान, मुंबई इंडियन्समधील परस्पर मतभेदाच्या बातम्यांनी क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएल 2024 दरम्यान रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवून हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद देण्यात आलं होतं.
रोहितला हटवून हार्दिकला कर्णधार केल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे चाहते खूप निराश झाले होते.
सामना सुरु असताना मैदानात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात आले.
तसेच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दोन गट पडल्याचे देखील समोर आले होते.
आयपीएलनंतर लगेच आयसीसी टी-20 विश्वचषकाची स्पर्धा होती आणि यावेळी रोहित शर्माकडे टीम इंडियाची धूरा होती. त्यामुळे रोहित आणि हार्दिक यांच्यातील मतभेद दूर होतील की नाही?, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. याचदरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
एका वृत्तानूसार रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला एकत्र आणण्यात राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनीही खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
राहुल द्रविडने विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासारख्या प्रसिद्ध खेळाडूंना एकत्र ठेवले आणि टीम इंडियाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. दरम्यान, आयपीएल 2025 च्या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला सोडून लखनौचा ताफ्यात दाखल होऊ शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
दरम्यान, आयपीएल 2025 च्या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला सोडून लखनौचा ताफ्यात दाखल होऊ शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
तसेच मेगा लिलावात रोहित शर्माने ना दिल्यास लखनौ सुपर जायंट्सकडून 50 कोटी रुपयांची बोली लावणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.