Virat Kohli : सोशल मीडियावर विराटचं 'किंग'! धोनी, सचिन आसपासही नाही
'किंग' कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोहलीचे भारतातच नाही तर, जगभरात असंख्य चाहते आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) आणि टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.
विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई व्यक्ती (First Asian to Reach 250 Millions Followers) बनला आहे.
इतकंच नाही तर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर (Cristiano Ronaldo) हा विक्रम करणारा विराट कोहली तिसरा खेळाडू आहे.
विराट कोहली हे नाव फक्त भारतीय क्रिकेटशी जोडलेलं नसून जगभरात प्रसिद्ध आहे. मैदानावरील 'अँग्री यंग मॅन' विराट कोहली त्याची दमदार खेळी पॉवर हिटिंगसाठी प्रसिद्ध आहे.
विराट कोहली सध्या 34 वर्षांचा आहे. कोहलीनं यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दोन शतकं ठोकली.
यंदाच्या मोसमातून आरसीबी संघाचं आव्हान संपलं आहे. त्यामुळे सध्या कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात आरसीबी संघासाठी विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली आहे. कोहलीनं आयपीएलमध्ये सर्वाधिक आठ शतकं ठोकण्याचा विक्रमही स्वत:च्या नावे केला आहे.
विराटनं सलग दोन सामन्यात शतकं ठोकली मात्र, संघाचा पराभव झाला. आयपीएल 2023 मधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
आतापर्यंत आरसीबी संघाला एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता कमी होतेय की काय असे तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, कोहलीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय आणि आशियाई बनला आहे. मेटा कंपनीची मालकी असलेला सोशल मीडिया प्लॅटफर्म इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या आशियाई व्यक्तींच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे.
त्यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा कर्णधार एमएस धोनी 42.2 दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरचे इंस्टाग्रामवर 40.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
विराट कोहली भारतीय संघाच्या पहिल्या बॅचसह इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. लंडनमध्ये पार पडणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याआधी विराट कोहली दोन आठवडे सराव करणार आहे.