Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Team India : टीम इंडियासाठी स्पेशल चार्टर्ड प्लेनची व्यवस्था, भारतात कधी पोहोचणार, बीसीसीआयकडून मोठी अपडेट समोर
भारतानं 29 जूनला बारबाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारतानं 7 धावांनी विजय मिळवला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारबाडोसमध्ये चक्रीवादळाचा इशारा जारी करण्यात आला होता. यानंतर बारबाडोस विमानतळावरील उड्डाणं बंद करण्यात आली होती. विमानतळावरील सेवा कधी पूर्ववत होणार याबाबत काही माहिती समोर आलेली नाही.
बीसीसीआयचे सचिव जय शाह टीम इंडिया सोबत बारबाडोसमध्ये आहेत. त्यांनी भारतात परत येण्यासंदर्भात माहिती दिली आहे. बारबाडोसमध्ये असलेले खेळाडू आणि पत्रकारांना सुरक्षित पणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं जय शाह म्हणाले.
चार्टर्ड विमानातून भारतीय खेळाडूंना आणि इतरांना भारतात आणलं जाईल. चार्टर्ड विमानातून भारतीय संघ अमेरिकेला आणि नंतर यूरोपला जाईल. तिथून संघ भारताकडे रवाना होऊ शकतो.
बीसीसीआयनं भारतीय संघासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. भारतीय संघ बारबाडोसमधील स्थानिक प्रमाणवेळेनुसार 6 वाजता आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या रात्री पावणे आठ वाजता भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल होईल.