In Pics : तिसऱ्या वन-डेसाठी तिरुवनंतपुरमला पोहोचला भारतीय संघ, पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन घेतलं दर्शन
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा एकदिवसीय सामना तिरुवनंतपुरमच्या मैदानात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्या अर्थात रविवारी तिरुवनंतपुरममध्ये सामना होणार असून त्यासाठी दोन्ही संघ त्याठिकाणी पोहोचले आहेत.
तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील अनेक खेळाडू देवाचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी श्री पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचल्याचं पाहायला मिळालं. भारतीय खेळाडू पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याशिवाय खेळाडूंचे विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारतीय संघासह श्रीलंकेच्या संघातील खेळाडूही यावेळी दिसून येत आहेत.
या मालिकेत टीम इंडियाने श्रीलंकेवर 2-0 अशी विजयी आघाडी घेतली असून व्हाईट वॉश देण्याच्या प्रयत्नात टीम इंडिया आहे.
कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव करत एकदिवसीय मालिका जिंकली होती.
त्याचबरोबर या मालिकेतील पहिला सामनाही भारताच्या नावावर झाला. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला होता.
टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अशा स्थितीत टीम इंडिया क्लीन स्वीप करत ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर करेल, अशी आशा सर्वांना आहे.
अखेरच्या सामन्यात विराट पुन्हा एकदा शतक ठोकतोका हे पाहण्यासाठीही भारतीय चाहते उत्सुक आहेत.