Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldhana: बुलढाण्यात महापंगत, 151 क्विंटल गव्हाची पुरी तर 105 क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद
बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाच दरवर्षी साजरा करण्यात येतो. यंदा हा 160 वा जन्मोत्सव आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनानंतर यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या सोहळ्याची सांगता आज भव्यदिव्य अशा महापंगतीने होणार आहे.
या महापंगतीच्या महाप्रसादाच्या निर्मिती कामाला काल पहाटे पासूनच सुरुवात झाली
लाखो भाविकांसाठी या महाप्रसाद निर्मितीचे कार्य तब्बल 26 तासापासून सुरू आहे.
आज दुपारी तब्बल दीड ते दोन लाख भाविकांच्या एकाच पंगतीत महाप्रसादच वितरण होणार आहे.
राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांना तीन हजार स्वयंसेवकांच्या मदतीने महाप्रसादाचे वाटप आज करण्यात येणार आहे.
100 ट्रॅक्टरद्वारे, दीड हजार कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्या सहाय्याने शिस्तबध्द पध्दतीने महाप्रसादाचे वितरण दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे.
भाविकांना 151 क्विंटल गव्हाची पुरी, 105 क्विंटल वांग्याच्या भाजीचे आज वितरण होणार आहे.
हा महाप्रसाद बनविण्यास शुक्रवारी पहाटे ब्रह्ममुहुर्तावर प्रारंभ झाला
हजारो स्वयंसेवकांच्या मदतीने हा महाप्रसाद बनविण्यात आला आहे.
2013 साली या पंगतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली