IND vs SL : भारताचा महत्त्वाचा श्रीलंका दौरा काही दिवसांवर, टीम इंडियाचा कॅप्टन कोण असणार? दोन खेळाडूंची नावं शर्यतीत
भारताचा संघ जुलै आणि ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत केएल राहुल आणि हार्दिक पांड्या भारताचे प्रमुख खेळाडू असतील. भारत श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची आणि टी 20 सामन्यांची मालिका खेळेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल. पीटीआयच्या रिपोर्टनुसार केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्या नावाचा श्रीलंका दौऱ्यासाठी कॅप्टन पदासाठी विचार केला जात आहे.
श्रीलंका दौऱ्यावर भारताचे अनुभवी खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बमराह न जाता आराम करु शकतात, अशी शक्यता आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असतील.
हार्दिक पांड्यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये उपकप्तान म्हणून भूमिका पार पाडली आहे. तर, दुसरीकडे जानेवारी 2024 नंतर केएल राहुलनं भारतीय संघाकडून क्रिकेट खेळलेलं नाही.केएल राहुलनं त्याची शेवटची वनडे मॅच डिसेंबर 2023 मध्ये खेळली होती.