In Pics : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी20 साठी Team India सज्ज, बीसीसआयनं शेअर केले खास फोटो

ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ एक प्रकारचे सराव सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) भारत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत असून पहिला सामना भारताने जिंकला आहे.

आता दुसरा सामना गुवाहाटी येथे पार पडणार आहे.
या सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीला पोहोचली असून सध्या कून सराव करत आहे.
बीसीसीआयनं खेळाडूंचे सरावादरम्यानचे फोटो शेअर देखील केले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात यांच्यात टी20 मालिकेला 28 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना भारताने 8 विकेट्च्या फरकने जिंकला.
त्यानंतर आता दुसरा सामना रविवारी (2 ऑक्टोबर) रोजी खेळवला जाणार आहे.
हा सामना गुवाहाटीच्या बरासपरा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
पहिल्या सामन्यात भारताने उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवलं. खासकरुन युवा गोलंदाज अर्शदीपनं कमाल गोलंदाजी केली. दीपक चाहरनंही त्याला चांगली साथ दिली.
त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही संघाकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे. सामन्यासाठी टीम इंडिया तितकाच कसून सराव करत असून या वेळेचे फोटो बीसीसीआयनं पोस्ट केले आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी20 सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे.
भारताने हा सामना जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेईल.