Kanpur Road Accident : कानपूरमधील अपघाताचं भीषण वास्तव; रुग्णालयाबाहेर स्थानिकांचा रोष, पाहा मन हेलावणारे फोटो
Kanpur News : उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला आहे. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 14 महिला आणि 12 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेचा पंतप्रधान मोदींनी देखील शोक व्यक्त केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकानपूरमध्ये शनिवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत 20 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान कानपूर पोलिसांनी रुग्णालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. या घटनेनंतर कानपूरमधील काळीज पिळवटणारे काही फोटो समोर आले आहेत.
अपघातानंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. स्थानिकांनी प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच, प्रशासनानं अपघातानंतर तात्काळ दखल घेतली नाही, तसेच घटनास्थळी पोहोचण्यास उशीर केल्याचाही आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांचं म्हणणं आहे की, अपघातानंतर बचावकार्य लवकर सुरु नाही झालं. तसेच, रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्यानं मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचा गंभीर आरोपही स्थानिकांनी केला आहे. स्थानिकांचा रोष पाहता कानपूरमधील रुग्णालयाच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घटनेचं वास्तव सांगणारा एक फोटो सध्या समोर आला आहे. फोटो पाहून डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. अपघातानंतर एक महिला रुग्णालयाबाहेर उभी राहून टाहो फोडतेय. तिची मुलगी तिचे डोळे पुसतेय.
अपघाताबाबत माहिती मिळताच, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य तात्काळ सुरु केलं.
स्थानिकांनीची अपघाताची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्टरही पाण्याबाहेर काढण्यात आला.