In Pics : एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, कसून सुरु आहे सराव, पाहा PHOTO
भारताने न्यूझीलंडला टी20 मालिकेत मात दिल्यानंतर आता एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत मैदानात उतरणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उद्या अर्थात 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात करणार आहे.
शुक्रवारी, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे.
दोन्ही संघांमधील हा सामना ऑकलंड येथे होणार आहे. या सामन्याद्वारे भारत 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठीचा सराव सुरु करेल.
दरम्यान सामन्यापूर्वी खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत.
बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर खेळाडूंचे सरावाचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये फलंदाजांसह गोलंदाजही मैदानात घाम गाळताना दिसत आहेत.
दरम्यान यावेळ संघात नेमकी कोणत्या 11 खेळाडूंना जागा मिळणार हे पाहावे लागेल.
संघाचा विचार करता भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे. - शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसी सामने टी20 सामन्यांप्रमाणे पाहता येणार असल्याने या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.