Photo : राज्यात तुरीचा हंगाम धोक्यात?
राज्यात तुरीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यात तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळं उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचा सल्ला अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.
सध्या तुरीवर मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे. राज्यातील विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
तूर उत्पादक पट्ट्यामध्ये जवळपास दोन ते तीन लाख हेक्टरवरील तुरीचे पीक या किडीच्या प्रादुर्भावामुळं सध्या बाधित झालं आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक हे सोयाबीन आहे. त्यानंतर प्रमुख पीक म्हणून तुरीकडे बघितलं जातं
राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा जोर वाढल्यामुळं तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे बोलले जात आहे.
शेंगा पोखणाऱ्या अळीमध्ये तीन प्रकारच्या अळी असतात, यामध्ये शेंगा पोखरणारी अळी, पिसाळी पतंग आणि शेंग अळी या तिन प्राकराच्या किडीचा प्रादुर्भाव मराठवाडा आणि विदर्भातील तुर पिकावर झाला आहे.
विदर्भाचा विचार केला तर अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.
आधीच अतिवृष्टीमुळं सोयाबीन आणि कापूस पिकाच मोठं नुकसान झालं आहे. यात आता तूर पिकावर किडीचा प्रादुर्भाव होत आहे.