In Pics : टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज, समोर आले सरावाचे खास फोटो
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर मालिका सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिला सामना नुकताच भारताने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
आता मालिकेत दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार असून हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी सर्वच खेळाडूंनी कसून सराव सुरु केला आहे.
बीसीसीआयनं खेळाडूंचे सरावादरम्यानचे फोटो शेअर देखील केले आहेत.
या सामन्यात भारत नेमकी कोणती प्लेईंग 11 घेऊन उतरतो ते पाहावे लागेल. कारण श्रेयस अय्यर संघात परतल्यामुळे नेमकी अंतिम 11 आता निवडावी लागेल.
त्यात दिल्लीच्या मैदानात भारताचा रेकॉर्ड फार खास असल्याने भारत विजयासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार आहे.
1987 पासून भारताने दिल्लीत एकही कसोटी सामना गमावलेला नाही.
दिल्लीत खेळल्या गेलेल्या 34 पैकी 13 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे, तर फक्त सहा गमावले आहेत.
ऑस्ट्रेलियन संघ दिल्लीत एकूण 7 कसोटी सामने खेळला आहे. 1959 पासून कागारुंचा संघ विजयाची वाट पाहत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2013 साली दिल्लीत खेळला गेला होता.
त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 8 विकेट्सनी कांगारुंचा पराभव केला होता. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 14 बळी घेत टीम इंडियासाठी मोठ्या विजयाचा पाया रचला होता.