IND vs ENG 4th T20 : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया नव्या जोमात पुण्यात दाखल; पाहा Photos

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तीन सामने खेळल्या गेले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आता चौथा टी-20 सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

या सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात पोहोचली आहे.
पुण्यात उद्या म्हणजे 31 जानेवारी शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल, तर टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होईल.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंचे पुण्यात पोहोचल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावरून शेअर केले.
तीन सामन्यांनंतर टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
अशा परिस्थितीत, पुण्यात खेळला जाणारा चौथा टी-20 सामना जिंकून टीम इंडियाला अजिंक्य आघाडी मिळू शकते.
मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला.
त्यानंतर राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 मध्ये, मेन इन ब्लूने 2 विकेट्सने विजय मिळवला.
यानंतर, तिसऱ्या टी-20 मध्ये इंग्लंडने 26 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत स्वतःला कायम ठेवले.