Jalgaon : जळगावमध्ये पालिकेचा वृद्ध दाम्पत्याचा घरावर हातोडा, फरफटत घरातून बाहेर काढलं

वयोवृद्ध दाम्पत्याला घराबाहेर काढत जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्या घरावर हातोडा चालवल्याने, संताप व्यक्त केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जळगाव शहरातील जिल्हा कारागृहाच्या मागील गणेश नगर येथे राहणाऱ्या 80 वर्षीय वयोवृध्द दाम्पत्याला दंडूकेशाहीचा अवलंब करत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने राहत्या घरातून ओढून काढत घर मोडल्याचा गंभीर प्रकार घडला.

गेल्या 52 वर्षांपासून पीडित दाम्पत्य या ठिकाणी वास्तव्यास होते.
त्यांच्या बाजूलाच महापालिकेच्या विधी विभागातील अधिकारी मनोज शर्मा यांच्या घराशेजारीच त्यांचे झोपडे असल्याने त्यांच्याच सांगण्यावरुन हा सर्व उपद्व्याप घडवून आणल्याची तक्रार पिडीत सुतार दाम्पत्यातर्फे करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अधिकारी मनोज शर्मा यांनीच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक बोलावून घेतले.
त्यानंतर या दाम्पत्याला राहत्या घरातून हात धरुन मनपा कर्मचाऱ्यांनी फरफटत बाहेर ओढून काढले.
आधीच मोडकळीस आलेले घर अतिक्रमण विभागाने मोडून मरणाला टेकेलेल्या वयोवृद्ध दाम्पत्यास बेघर केलं आहे.
या आजी-आजोबांच्या डोक्यावरील छत्रच हरवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.