In Pics : विराट कोहलीचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून घेणार ब्रेक
भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्पुरती विश्रांती घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे विराट आयपीएल 2023 पूर्वी भारतासाठी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट अर्थात टी20 मध्ये खेळताना दिसणार नाही.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी ही महिती समोर आली.
विराट कोहलीच्या ब्रेकबद्दल माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सला माहिती दिली.
त्यांनी सांगितलं की “होय, विराटने कळवले आहे की तो टी20 सामन्यांसाठी उपलब्ध नाही. वनडे मालिकेतून तो संघात पुनरागमन करेल. मात्र, तो टी-20 इंटरनॅशनलमधून किती काळ ब्रेक घेत आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.''
विराट श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत मैदानात उतरेल असे अनेकांना वाटत होते.
पण विराटनं ब्रेक घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
विराट टी20 वर्ल्डकप दरम्यानकमाल फॉर्मात होता. त्याने काही दमदार खेळी यावेळी केल्या.
आता मात्र विराट एकदिवसीय आणि कसोटी फॉर्मेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ब्रेक घेत असल्याचं समोर येत आहे.
विराट लवकरच मैदानात परतावा अशी आशा त्याच्या फॅन्सना आहे.