ICC T-20 World Cup 2024: 'नाम बडे और दर्शन छोटे'...; 5 दिग्गज टी-20 विश्वचषकात फ्लॉप ठरण्याची शक्यता, पाहा यादी
वेस्ट इंडीज आणि अमेरिका T20 विश्वचषक आयोजित करण्यासाठी सज्ज आहेत. ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होत आहे. अनेक संघांनी सराव देखील सुरु केला आहे. यंदाच्या विश्वचषकात एकूण 20 संघ असणार आहे. तर 4 ग्रुप तयार करण्यात आले आहे. आगामी टी-20 विश्वचषकात पुढील 5 खेळाडू फ्लॉप ठरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (image credit-ICC)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेन विलियमसन-न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन शेवटचा टी-20 विश्वचषक खेळणार आहे. परंतु सध्याची कामगिरी पाहिल्यास त्याला धावा करता आलेल्या नाही. आयपीएलमध्ये तो गुजरातचा ताफ्यात होता. परंतु यामध्ये त्याला फक्त 2 सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने 27 धावा केल्या. (image credit-ICC)
जॉनी बेयरस्ट्रो-इंग्लंडचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज जॉनी बेयरस्ट्रो आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळत होता. परंतु त्याने चांगली कामगिरी केलेली नाही. केकेआरविरुद्ध शतक झळकवण्याव्यतिरिक्त तो धावा करण्यात अपयशी ठरला. त्याने 11 सामन्यात 298 धावा केल्या. (image credit-ICC)
बाबर आझम-पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमचा या यादीत समावेश आहे. आगामी टी-20 विश्वचषकात बाबर आझम फ्लॉप ठरु शकतो. बाबर आझमचा टी-20मधील स्टाइक रेट 130 पेक्षाही कमी आहे. (image credit-ICC)
ग्लेन मॅक्सवेल-ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल मोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करतो. मात्र आयपीएलमध्ये त्याने धावा केल्या नाही. 10 सामन्यात फक्त 52 धावा मॅक्सवेलने केल्या. तर 6 विकेट्स घेतल्या. (image credit-ICC)
ऋषभ पंत-कार अपघातानंतर भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत पुन्हा संघात पुनरागमन करणार आहे. आयपीएलमध्ये पंतने चांगली कामगिरी केली. 13 सामन्यात 446 धावा केल्या. भारतात पंत चांगली कामगिरी करतो, पंरतु परदेशात धावा करणं त्याला अवघड जाण्याची शक्यता आहे. (image credit-ICC)