Team India : बड्या बड्या बाता मारणाऱ्या मिशेल मार्शचा करेक्ट कार्यक्रम, टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनला अस्मान दाखवलं
रोहित शर्मानं 92 धावांची वादळी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचं कंबरडं मोडलं. भारतानं 20 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 205 धावांचा डोंगर रचला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्श आणि ट्रेविस हेड यांच्या भागिदारीनं भारताचं टेन्शन वाढलं होतं. मिशेल मार्शला भारताकडून दोन वेळा जीवदान मिळालं होतं. 37 धावांवर असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षर पटेलनं घेतलेल्या अविश्वसनीय कॅचमुळं मार्श बाद झाला.
भारताकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला ब्रेक लावला. परिणामी ऑस्ट्रेलियन खेळाडू दबावात आले. अखेर भारतानं 24 धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं.
अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमधील पराभवानंतर मिशेल मार्शनं 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्हाला पुढचा सामना काहीही करुन जिंकायचा आहे आणि त्यासाठी आमच्यासाठी भारतापेक्षा चांगला संघ असू शकत नाही. ज्यांच्या विरोधात आम्हाला विजयाची नोंद करायची आहे, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याची सव्याज परतफेड टीम इंडियानं केली.
भारताचा कॅप्टन रोहित शर्माची कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनच्या तुलनेत सरस ठरली. रोहितनं 92 धावा केल्या तर मिशेल मार्शनं 37 धावा केल्या.
भारत आता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंड विरुद्ध लढणार आहे. भारातकडे 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील सेमी फायनलमधील पराभवाचा बदल घ्यायची संधी आहे.